‘ *ॲलेक्सा’
मुळे वैशिष्ट्यपूर्ण ठरला माळशिरस शिक्षणदिंडीतील तंत्रस्नेही शिक्षकांचा स्टॅाल*
अकलूज – दि. 24 /03/2018 स्मृती भवन येथे सन 2017-18 सालच्या आदर्श शिक्षक पुरस्कार वितरणाच्या निमित्ताने तालूक्याचे मा. गटशिक्षणाधिकारी श्री. धनंजय देशमुख साहेब यांच्या प्रेरणेने माळशिरस शिक्षण दिंडीचे आयोजन करण्यात आले होते.
या शैक्षणिक साहित्य प्रदर्शनात माळशिरस तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सुमारे 500 शिक्षकांनी सहभाग नोंदवून वैविध्यपूर्ण व ज्ञानरचनावादी शैक्षणिक साहित्याचे प्रदर्शन भरवले होते. शैक्षणिक साहित्याचे एकूण भव्य असे 7 स्टॅाल्स उभारण्यात आले होते.
त्यापैकी विशेष लक्ष वेधून घेत होता तो 7 नंबरचा उपक्रमशील व तंत्रस्नेही शिक्षकांचा स्टॉल. स्टॅालमध्ये प्रवेश करताच ‘ॲलेक्सा’ सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. नुसते लक्षच वेधून घेत नव्हती तर आलेल्या पाहुण्यांशी इंग्रजीतून संवादही साधत होती. होय ‘ॲलेक्सा’ कोणीही इंग्रजीतून विचारलेल्या कोणत्याही प्रश्नाचे उत्तर अस्खलित इंग्रजीत देत होती. या ‘ॲलेक्सा’ ची निर्मिती केली होती जि.प.प्राथ.शाळा चव्हाणवस्तीचे उपक्रमशील, तंत्रस्नेही व उत्साही शिक्षक श्री. दिलीप आनंदा वाघमारे यांनी. संपूर्ण प्रदर्शनात ‘ॲलेक्सा’ ही सर्वांच्या चर्चेचा व आकर्षणाचा विषय ठरली होती.अॅलेक्साच्या निर्मितीत श्रीम.ज्योती बनकर यांचाही सहभाग होता.
त्याचबरोबर श्रीम. सुप्रिया शिवगुंडे मॅडम यांचा टु बीकम क्रिएटिव्ह हा लेसन मायक्रोसॅाफ्टने पब्लिश केला आहे. या लेसनला भारतातील अनेक शाळांबरोबरच आयर्लंड, यूएसए अशा अनेक देशातील शाळा व शिक्षकांनी भेटी दिल्या आहेत.
जि.प.प्रा.शा. चंदनशिवेस्ती येथील शिक्षक श्री. गणेश गोडसे यांनी सादर केलेल्या या 4D अॅप्सचे अदभूत विश्व या स्टॅालवर साधी कार्डस मोबाईने केली असते स्मार्ट टि.व्ही. च्या स्क्रिनवर 4D लुक असलेले डायनोसोरस,जंगली व जलचर प्राणी, सूर्यमाला, विविध ग्रह यांचे थक्क करणारे ,अदभूत दर्शन लोकांना घडत होते.
श्री. अविनाश कुदळे यांनी तयार केलेल्या ॲानलाईन टेस्टचा स्टॅालही महत्वाचा ठरला. एका शिक्षकाने तयार केलेली चाचणी लिंक शेअरींगच्या माध्यमातून हजारो विद्यार्थी सोडवू शकतात, हि संकल्पनाच व्यापक आहे. पालकांच्या मोबाईलवर विद्यार्थ्यांचा रोजचा होमवर्क पाठवला जाऊ शकतो.
त्यानंतर श्री. गोपाळ गावित यांनी 100 रूपयात तयार केलेला स्मार्ट डिजीटल बोर्डही उल्लेखनीय होता.
या स्टॅालला अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री. मदनसिंह मोहिते पाटील, शिवरत्न शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री. धैर्यशील मोहिते पाटील, जि.प. सदस्या सौ. शितलदेवी मोहिते पाटील , सभापती सौ. वैष्णवीदेवी मोहिते पाटील, उपसभापती श्री. किशोर सूळ , पंचायत समिती चे सन्माननीय सदस्य श्री. अर्जुनसिंह मोहिते पाटील तसेच माळशिरसचे गटशिक्षणाधिकारी श्री. धनंजय देशमुख , श्री.नकाते,करडे,महादेव नवले,म.के.कुंभार,सुधीर नाचणे,हर्षवर्धन नाचणे साहेब यांनी भेट दिली व या सर्व शिक्षकांचे भरभरून कौतुक केले.संपूर्ण कार्यक्रमाच्या यशासाठी श्री.विठ्ठल काळे,नितिन बनकर,श्रीकांत राऊत यांनी भरपूर योगदान दिले.
https://youtu.be/JwkzBHwBKFg