Friday, 23 December 2016

*गणितीतज्ञाचे स्मरण*
आज जागतिक गणित दिन
*श्रीनिवास रामानुजन* यांची जयंती. त्यानिमित्त आज दिवसभर गणिते,गणिताचे विविध खेळ यांनी दिवस अगदी भरुन गेला होता.
       गणिताच्या विविध खेळांना मुलांनी दिलेली दाद अगदी विलक्षण अशी होती.खेळातून गणित ही संकल्पना खरेच मस्त आहे.अवघड गणिते,संख्याज्ञान मुलांनी सहज सोडवले,त्यातीलच एक साधा खेळ
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

Saturday, 3 December 2016

🕴🕴🕴🕴🕴🕴 🕴🕴 *शैक्षणिक तंञज्ञानाच्या साहाय्याने जादू निर्मिती*
~जि.प.शाळा चव्हाणवस्ती(बागेचीवाडी) ~
येथे आज मुलांना अंधश्रदधा व छोटे छोटे चमत्कार जे भोंदू बूवा करतात त्यातील लपवाछपवी सांगण्यात आली.
प्रत्येक गोष्टीची चिकित्सा केल्याशिवाय त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवू नये.
*शाळेतीलच एका मुलीला वर्तमानपञ फाडणे व परत जोडणे यावर एक यशस्वी प्रयोग करून घेतला*
डिजीटल आधूनिक तंञ वापरून आपण काय काय करु शकतो याचा जि.प.शाळा.चव्हाणवस्तीतील मुलांना साक्षात्कार झाला

Tuesday, 8 November 2016

*युडायस तपासणीस आले व मुलांत रमून गेले*👫👫👫👫

आज रोजी *B.R.C.चे तज्ञ मा.सतिश शिंदे सरांनी जि.प.शाळा.चव्हाणवस्ती(बागेचीवाडी)स भेट दिली*..
निमित्त होते युडायस चेकिंगचे., पण शाळेच्या आवारात आल्यानंतर मनमोकळे,प्रसन्न वातावरण तसेच दोघा-दोघांचे गट करून ट्रे मधील ज्ञानरचनावादी साहीत्यांचा वापर करून स्वयंअध्यन करणारी मुले पाहून खूष झाले..
         *युडायस चेकिंगचा फाॅर्म बाजूला ठेऊन चक्क मुलांच्या गटात जाऊन बसले,आपले सर आपल्या गटात बसतात हे मुलांना माहीत होते पण साहेबांना गटात मांडी घालून बसलेले पाहून मुले नटली..*
लाकडी ठोकळ्यावरील अक्षरे,शब्द,चिञे यावर प्रश्न विचारले
स्वत: लावू लागले...
मुलांची ,शाळेची प्रगती पाहून समाधान व्यक्त केले...
*मुलांत रमूण गेलो हे त्यांचे वाक्य बरेच काही सांगून गेले...*🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

Saturday, 22 October 2016

HAPPY DIPAVALI

💥💥💥💥💥 *HAPPY DIPAVALI*💥💥💥
From *Z.P.SCHOOL.CHAVANWASTI*🌹🌹🌹🌹🌹🌹
*दिपावलीनिमित्त शाळेतील सर्व मुलांनी एकमेकांच्या सहकार्याने शाळेच्या आवारात दाट झाडीमध्ये किल्ल्याची उभारणी केली.. चिमुकले मावळेच किल्ल्याची बांधणी करताहेत असं वाटतं होतं.स्वत: तयार केलेली भेटकार्ड व आकाशदिवे  व पणत्या अभिमानाने दाखवित होती..💥💥💥🌹🌹🌹🌹🌹💥💥💥

Saturday, 15 October 2016

वाचन प्रेरणा दिन&जागतिक हात धूवा दिन

📖📖📖📖 *वाचन प्रेरणा दिन*📖📖📖📖📖📖📖
🤗👏🏻✊👐🏻🚿 *जागतिक हात धूवा दिन*🤗👏🏻✊👐🏻

जि.प.शाऴा चव्हाणवस्ती(बागेचीवाडी)मध्ये उत्साहात साजरा..........🌹 *डाॅ.ए.पी.जे.अब्दूल कलाम यांच्या कार्याचा आढावा व त्यांच्यावर आधारीत व्हिडीओ क्लीप दाखवून वाचन प्रेरणा दिन सुरू झाला*
☀☀💥💥💥💥💥💥💥
*वाचन प्रेरणा दिनानिमित्त लेखक मा.दिलीप मुळे यांच व्याख्यान*
*मुळे सरांनी ओघवत्या शैलीत पाखरया या त्यांच्या कादंबरीतील बैलावर आधारीत माहीती सांगून लेखक होण्याच्या पायरया सांगितल्या*
मुलांच्या विविध प्रश्नाची उत्तरे दिली.उपक्रमशील शिक्षक मा.राजेंद्र सोनवणे उपस्थित होते.
👨🏻👨🏼👨🏾👨 *वाचन प्रेरणा दिनानिमित्त ग्रामस्थांचा लक्षणिय सहभाग* 👨🏼👨🏾👨🏻👨
आमचे शिक्षकमिञ प्राध्यापक *मा.रवीकांत शिंदे,उपक्रमशिल शिक्षिका मा.शीतल मगर/शिंदे मॅम यांनी शाळेतील मुलांसाठी पुस्तके घेण्यास रोख१०००रू.दिले होते+३५०० अनुदान अशी४५०० रू.ची पुस्तके मुलांनी व ग्रामस्थांनी वाचून वाचन दिन उत्साहात साजरा केला*
...............                  ...............
🤗👐🏻🚿 *जागतिक हात धूवा दिन*🚿👐🏻🤗 सात पद्धतीचे प्रात्यक्षिक करून व विविध खेळ घेउन साजरा झाला. *स्वच्छतेचे महत्व,फायदे ग्रामस्थांना पटवून देण्यात आले*

Monday, 26 September 2016

धूळपाटीचा नविन अवतार..रांगोळीपाटी

*🎨🎨🎨धूळपाटीचे नविन रुप रांगोळी पाटी*🎨🎨🎨🎨
🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾
जि.प.शाळा.चव्हाणवस्ती(बागेचीवाडी) येथे रांगोळी पाटीचे उदघाटन मा.श्रीकांत(आप्पा)राऊत सरांच्या हस्ते करण्यात आले.
सध्या पावसाळी वातावरण असल्याने धूळपाटीत धूळच नसल्याने धूळपाटीला नविन रुप देऊन टाकाऊ लाईट फिटींगच्या पट्टीचे चौरस आखले..त्यात मुलांच्या आवडीची रंगीत रांगोळी टाकून १ नाही,२नाही तर ४ रांगोळी पाटया तयार केल्या..मुले मुळाक्षरे,शब्द,अल्फाबेटस त्यात बोटांचा वापर करुन लिहतात,हात फिरवला की मोकळी पाटी दुसरं लिहायला🏒🏒🏒🏒
प्रेरणा-मा.राजकुमार राजगुरू सर इंदापूर🙏🏼🙏🏼

Tuesday, 20 September 2016

ई-लर्निंग स्वस्त व मस्त

*🖥💻फक्त ५०० रूपयात ई-लर्निंग शाळा*📱📱
जि.प.शाळा.चव्हाणवस्ती(बागेचीवाडी) येथे फक्त ५०० रुपयांचे ब्ल्यूटूथ आणून लाईट नसतानाही मोबाईलवर घेतलेल्या शैक्षणिक अॅपच्या साहाय्याने ई-लर्निंग सुरु..
मोबाईलवरील अक्षरे व चिञ जोडया लावणे हा खेळ खेळताना सहकार्याची भावना वाढीस लावत तल्लीन झालेली इ.१ ली चे विदयार्थी👬👬👬👬👬

Friday, 16 September 2016

शाळाभेट .

💐💐 *शाळाभेट व खाऊ वाटप*
🌺🌺आज माळेवाडी(बोरगाव) च्या मुख्याध्यापिका  मा.उज्वला कुलकर्णी मॅडम यांनी जि.प.शाळा.चव्हाणवस्ती(बागेवाडी)स भेट दिली..
रिटायरमेंट जवळ आली असतानाही त्यांनी शाळेतील विविध उपक्रम,ज्ञानरचनावादी साहीत्य,त्यांची मांडणी याची अतिशय बारकाईने विचारपूस केली..मुलांना बोलते केले, गप्पा मारून प्रगती जाणून घेतली.
त्यांचा उत्साह, जिज्ञासा पाहून मनोमन त्यांना सॅल्यूट केला..
शेवटी मुलांना एकञ बोलावून त्यांनी मुलांच्या आवडीचे चाॅकलेटचे एक नाही तर दोन पुडे भेट दिले.
शाळा व मुलांच्या प्रगतीबद्दल गौरवोदगार काढले..
शाळा त्यांची ऋणी आहे....🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

Monday, 12 September 2016

गणेश मंडळाचे विधायक कार्य

🎨 *रांगोळीस्पर्धा,चिञकला व श्रमदानातून शालेय परिसर स्वच्छता*🎨🐾👬👬
शिवछञपती गणेशोत्सव मंडळ चव्हाणवस्ती(बागेचीवाडी) कडून यावर्षी विधायक कार्य,रंगोली व चिञकला स्पर्धा सर्व मुलांच्या घेण्यात आल्या.कागद,रंग तसेच रांगोळी सुद्धा मंडळाकडून सर्व स्पर्धकांना पुरविण्यात आली..
जोपर्यंत स्पर्धा सुरु आहे तोपर्यंत मंडळाच्या सदस्यांनी खोरे,कोयता,पाटी,दोर इ.साहीत्य आणून शाळेसमोरची विविध काटेरी झाडे,रानगवत इ.काढून परिसर चांगला स्वच्छ केला..
शिवछञपती गणेश मंडळाचे जि.प.शाळा.चव्हाणवस्ती कडून हार्दिक अभिनंदन💐करण्यात आले..
 *जर सर्वच गणेश मंडळानी 👆🏻असं ठरवलं तर* 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🇮🇳🇮🇳🇮🇳


Thursday, 8 September 2016

सर्पांच्या विश्वात..सखोल माहीती

🐍 *सर्प माहीती व हाताळणी*🐍 प्रात्यक्षिक.........
आज जि.प.शाळा.चव्हाणवस्ती(बागेचीवाडी) येथे सर्पाची माहीती व दर्शन उपक्रम राबविला......
पावसाळा असल्याने साप बरयाचवेळा बीळातून बाहेर निघतात,त्यावेळी काय करायचे..विषारी/बिनविषारी साप कसे ओळखायचे हे व मुलांचे विविध प्रश्न👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
१)साप डूख धरतो का?
उत्तर-अजिबात नाही.
२)साप चावल्यावर तुम्ही काय करता?
उत्तर-एक विशिष्ट झाडपाला आहे,तो लावतो पण सध्या दुर्मिळ होत चाललाय.
३)साप एकावेळी किती अंडी घालतो?
उत्तर-कमीत कमी ५०.
४)साप दूध पितो का?
उत्तर-नाही...
या व इतर विविध प्रश्नांची उत्तरे मुलांना मिळाली,प्रत्यक्ष साप हातात घेऊन मुलांनी स्पर्श,गंध इ.ज्ञान मिळवले.....

Saturday, 3 September 2016

रंगांची दुनिया

आज जि.प.शाळा.चव्हाणवस्ती(बागेचीवाडी) येथे
मुलांची रंगभरण चि़ञांमध्ये ही स्पर्धा घेतली.
मातीतील काम व चिञकाम या गोष्टी मुलांच्या
फारच आवडीच्या..
मुले सर्व साहीत्य घेऊन पेपरची वाट पहात बसली..पेपर
हातात आल्यावर प्रत्येकजण आपापल्या रंगाच्या
दुनियेत रमून गेला...एकमेकांना सहकार्य करत सगलेच
आपले चिञ कसे सुंदर दिसेल,कोणता रंग छान दिसेल,
दुसरयापेक्षा माझा पेपर कसा छान दिसेल या बालसुलभ
विवंचनेत गढून गेली....
रंगभरण चालू असतानाचा टिपलेला एक क्षण..

Tuesday, 30 August 2016

शेतकरी मुलाखत व बैलनिर्मिती(चिखलकाम)

🐂🐂 *बैलपोळ्यानिमित्त शेतकरी मुलाखत व बैलनिर्मिती कार्यशाळा*🐂🐂
         आज जि.प.शाळा.चव्हाणवस्ती(बागेचीवाडी)येथे प्रगतशील शेतकरी मा.प्रभाकर चव्हाण यांनी भेट दिली..मुलांनी त्यांना शेतीविषयी भरपूर प्रश्न विचारले,त्यांनीही अगदी न कंटाळता सर्वांना उत्तरे दिली.
मुलांनी मातीचा बैल करून दाखवा असे म्हणताच मुलांत बसून चिखलाचा अगदी सुंदर असा बैल केला व मुलांकडूनही करुन घेतला.पावसाने ओढ दिलीय नाहीतर शेती १ च नंबर,व्यापार २ नंबर व नौकरी ३ नंबर असे सांगून मुलांना शेतीविषयी आकर्षण निर्माण केले.
*शेतकरी मुलाखत व चिखलकाम यामुळे मुले खूष होती*

Sunday, 28 August 2016

SELF STUDY

यहां होता है सेल्फ स्टडी..
स्कूल है जिला परिषद का मगर यहां के छाञ
किसीसे भी कम नही. यहां कूल पचास प्लास्टिक
के ट्रे है और इनमे बच्चों के लिए जरुरी कार्डस,छोटे
छोटे टूकडों मे अक्षरों का भरमार है|
छाञ अपना अपना ट्रे लेकर खूद पढाई करते है|
जहां कठिनाई आती है वहां अध्यापकों से पूछते है|
मिलजूलकर पढाई करते है..हर कोई अपने धून मे मगन 
है|

Saturday, 27 August 2016

स्वच्छ व सुंदर शाळेच्या स्पर्धेत 5 स्टार

स्वच्छ व सुंदर शाळा स्पर्धा व मानांकन...
MHRD मार्फत ज्या स्पर्धा झाल्या...त्यात जि.प.शाळा.चव्हाणवस्ती(बागेचीवाडी) सहभागी झाली
होती..
जेवढया आवश्यक बाबी होत्या..उदा.पाणी,हॅन्डवाॅश स्टेशन,
टाॅयलेट मधील पाईप फिटींग ,पाण्याची टाकी इ.बाबी
अदययावत करून भाग घेतला होता..ग्रामस्थांच्या सहकार्य
व आपलेपणाने तयारी छान झाली होती.
त्यामुळे जाहीर झालेल्या गुणांकनात शाळेने 92.63%गुण
घेऊन, 5***** रेटिंग मिळवले..GREEN SCHOOL
श्रेणीत शाळा अव्वल आली..

Friday, 26 August 2016

मनमोहक वातावरण

*उत्साहाने सळसळणारी शाळा...
       जि.प.शाळा.चव्हाणवस्ती(बागेचीवाडी)
        ४वा.३०मिनिटे ही वेळ म्हनजे मुलांच्या खेळाची व शिक्षकाच्या उदया काय काय घ्यायचे याचा विचार करण्याची वेळ..
     एक शिक्षकबांधव मा.श्रीकांत राऊत सर यांनी शाळेस भेट दिली..पावसाचे बारीक तुषार,हिरव्यागर्द झाडीने नटलेला नयनरम्य परिसर,मुलांचा मंजूळ किलबिलाट हे सर्व पाहून राऊत सरांनी मुलांचा व्यायाम व खेळ घ्यायला सुरवात केली..
            मुलांमध्ये मिक्स होऊन लंगडी घालताना ते वेळेचे भान विसरून गेले,मुलेपण आप्पा..आप्पा या टोपननावाने त्यांना चिअरप करत होती...५ वाजून गेलेले कळलेच नाही..
मस्त शाळा व झकासच मुले हा त्यांचा अभिप्राय मन सुखाऊन गेला...

स्वातंञ्यदिन साजरा होताना

🇮🇳🇮🇳 *स्वातंञ्यदिन*..🇮🇳🇮🇳
जि.प.शाळा.चव्हाणवस्ती(बागेचीवाडी) येथे अतिशय उत्साहात हा राष्ट्रीय सण साजरा झाला..मा.रवी कार्वे(गायञी इन्फोसीस)यांनी शाळेस *संगणक*भेट दिला तसेच ग्रामस्थांच्या लोकवर्गणीतून   *हॅन्डसर्व्हिस स्टेशन*(उच्च दर्जाचे) उभारण्यात आले.
स्वच्छतेचे संदेश सांगून झाल्यावर मुलींनी हात धुण्याच्या सात पदधतीचे प्रात्यक्षिक दाखवले...*


स्वच्छ,सुंंदर शाळेसाठी

🌺🌺 *इच्छा तिथे मार्ग*🌺🌺
जि.प.शाळा.चव्हाणवस्ती(बागेवाडी)शाळा स्वच्छ भारत स्वच्छ विदयालय स्पर्धेत...
दहा भौतिक सुविधापैकी पाणी ही महत्वाची सुविधा ..पण दुष्काळी परिस्थिती,लहाण लोकवस्ती यामुळे शाळा नेहमी या सुविधेपासून वंचित..यावेळी तीव्र इच्छा अशी की 100%सुविधा झाल्यावरच स्वच्छ शाळेचा फाॅर्म भरायचा..नेहमीच शाळेस मदत करणारे आपले शिक्षकमिञ मा.श्रीकांत(आप्पा)राऊत सर यावेळेस पण धाऊन आले..अकलूज येथील प्रसिद्ध उदयोगपती मा.नवनाथ सावंत(धनश्री आॅटोमोबाईल्स)यांच्याकडून शाळेस देणगी म्हणून पाण्याची टाकी घेतली,दुष्काळी परिस्थिती असूनही चव्हाणवस्तीतील शिक्षणप्रेमी नागरिक मा.बाळासाहेब जनार्दन चव्हाण यांनी स्वत:च्या विहीरीवरून शाळेस पाईपलाईन करुन पाणी दिले..राञी सात वाजेपर्यंत सर्व काम पूर्ण झाले व स्वच्छ विदयालय पुरस्कार नोंदणीचा प्रामाणिक मार्ग प्राप्त झाला.. *मा.राऊत सर,मा.नवनाथ सावंत,मा.बाळासाहेब (बापू)चव्हाण या सर्वांची शाळा ऋणी राहील*
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐💐💐💐💐💐

ज्ञानरचनावाद..पतंगनिर्मितीतून

♦🔶🔷🔸🔹 *ज्ञानरचनावादातून पतंगनिर्मितीकडे*♦🔷🔶🔹🔸
जि.प.शाऴा चव्हाणवस्ती येथे कागदापासून पतंग तयार करण्यात आले..पतंग तयार करताना कागदाचे आकार,घडी घालणे,चौकोन तयार करणे,दोन ञिकोण एकञ केल्यावर चौकोण तयार होतो हे व इतर भौमितिक आकार अगदी हसतखेळत,कृतीयुक्त पद्धतीने(दोन-तीन कागदे खराब करून😊)मुलांनी आत्मसात केले..व *पतंग उडवू चला गडयांनो* म्हणत मुले पतंग उडवू लागली...
तर *मुलींनी* मेहंदी व झोका खेळत भावाचा उपवास साजरा केला..


संस्कार कटटा/अभिनव प्रयोग

*वाचनकोपरयाची जागा घेतली ...*वाचनकट्टयाने*
*संस्काराची* *बैठक*
 ♦जि.प.शाळा *चव्हाणवस्ती*(बागेचीवाडी) येथे मुलांना वाचन करण्यासाठी म्हणून नारळाच्या मोडून पडलेल्या झाडांचे दोन-अडीच फूटाचे तुकडे करून गोलाकार बैठक व्यवस्था केली व मुलांना सांगीतले की वाचन करतानाच या कट्टयावर बसायचे ... नारळाची झाडे बरयाच ठिकाणी कापून टाकलेली असतात त्यापैकीच एक निवडले मालकाची परवानगी घेतली मालक पालकच होते (मा.युवराज चव्हाण)त्यानंतर झाडाचे तुकडे पाडण्यासाठी दुसरे एक पालक(मा.राजू डोळसे)तयार झाले..विनामूल्य कट्टा तयार झाला..शाळेतील मुलांनी श्रमदानातून खड्डे घेतले तसेच कलर व ब्रश आणायला सांगून कट्टे पण रंगीत केले व गोलाकार बैठकव्यवस्थेतून झाला तयार कट्टा..*वाचनसंस्काराची बैठक*
मा.केंद्रप्रमुख नवले साहेबांनी कट्टा व मुलांचे विशेष कौतूक केले..

कट्टयावर बसायचे म्हणून मुले पुस्तकांचे वाचन करु लागली ,अडलेला शब्द एकमेकांना विचारू लागली न सांगताच अध्ययन अध्यापन ज्ञानरचनावादी पद्धतीने होऊ लागले..
*आपण नेहमीच देत असलेल्या काॅमेंट प्रेरणास्थान आहेत आमच्यासाठी*🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

उपक्रम गणिताचा

जि.प.शाळा.चव्हाणवस्ती(बागेवाडी) येथे मुलांना कृतीतून शिक्षण...(संख्येचा खेळ  )घेतला..१ते १०० मणी असलेली माळ आडवी बांधली,मुलांना संख्याकार्डे असलेला ट्रे दिला व संख्याकार्ड व मणी दोन्ही अचूक आले पाहीजे असे सांगीतले.मुलामुलात स्पर्धा सुरू झाली कोण किती संख्या दाखवतोय म्हणून....
     अवघड संख्याज्ञान एकदम सोपे झाले.....

आगळं वेगळं प्रदर्शन

🎨🚗🚕 *खेळण्यांच* *प्रदर्शन*🚜🚜🚘🏎🏎🚙
आज पहिलीच्या मुलांना आपापली खेळणी घरून आणायला सांगीतली..व त्यांचे प्रदर्शन मांडले..
सर्वजण अगदी भरभरून सांगत होते.. माझी खेळणी कोणी आणली ?
तसेच बारीकसारीक बाबी इ.आवडीचा विषय  असल्याने मुले जाम खुष होती...😇😇😇

वाटप गणवेशाचे

🌺🌺 *गणवेश* *व टायबेल्ट* *वाटप*🌹🌹🌹🌹
      जि.प.शाळा.चव्हाणवस्ती(बागेचीवाडी)
       ग्रामस्थ व पालकांच्या लोकवर्गणीतून टायबेल्ट व राज्यसरकारकडून २ गणवेश अशारितीने नटलेली मुले..
पालक व ग्रामस्थ यांनी स्वयंप्रेरणेनी सर्वच मुलांना टाय
व बेल्ट घेऊन दिले.

प्रवेशोत्सव.. राज्याची दखल

*जि* *प* *शाळा* *चव्हाणवस्तीची* *(बागेवाडी*) च्या *बैलगाडीतून* *प्रवेशोत्सवाची* *राज्यस्तरावर* *दखल*🌹🌹🌹🌹🌹🌸🌿🌸🌿🌸🌿🌸🌿🌸
कुणीही एकटे बोलू शकतं पण
गप्पा मारू शकत नाही..
कुणीही एकटे आनंदीत होऊ शकतं
पण सण साजरा करू शकत नाही..
कुणीही एकटे हसू शकतं पण
हर्षोल्लास करू शकत नाही..
कारण...
आपण सर्व एकमेकांशिवाय
काहीही करू शकत नाही...
Whats app व facebookवरील आमच्या सर्व मिञांनी ( तुम्ही) वेळोवेळी दिलेल्या प्रोत्साहन व प्रेमाचे हे फळ आहे...राज्यस्तरावर जी आमच्या शाळेची(चव्हाणवस्ती)जी दखल घेतली गेली त्याचे सर्व श्रेय तुम्हाला आहे...जि.प.शाळा.चव्हाणवस्ती(बागेवाडी)आपल्या सर्वांची शतश: आभारी आहे🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

सामाजिक वनीकरण दिन

🌿🌱🌴🌳🌲🎄☘🌾🌿
   एक झाड लावू मिञा.......
    त्याला पाणी घालूया🌧⛈🌧
  मोठे झाल्यावर त्याच्या
सावलीत खेळूया..............
या कवितेचा आनंद घेत सर्व मुलांनी सामाजिक वनीकरणात
आपापला वाटा उत्सफूर्तपणे उचलला.
जि.प.शाळा.चव्हाणवस्ती(बागेवाडी)
येथे ग्रामस्थ व पालकांच्या हस्ते वृक्षारोपण करून सामाजिक वनीकरणात खारीचा वाटा उचलताना विदयार्थी व पालक,ग्रामस्थ🌲🎄🌾🍁🌿🌱🌴☘

निसर्गाच्या सानिध्यात स्वयंअध्यन

जि.प.शाळा.चव्हाणवस्ती(बागेवाडी)
               🍁☘🍁☘☘🍁
आज इ.३री च्या मुलांना रानवेडी ही कविता प्रत्यक्ष रानातच नेऊन शिकवली..रान,डोंगर,बुरांडी,टंटनी व निवडूंग मुलांनी हाताळले ,टंटनीची फूले तर तोडून हाताळली..
   प्रत्यक्ष रानात फिरल्यामुळे रानाच्या सानिध्यात मुले खरच रानवेडी झाली होती..☘🍁☘🍁☘🍁

Thursday, 25 August 2016

योगदिन साजरा करताना

२१जून ....योगासने,सूर्यनमस्कार म्हनजे मुलांचा
आवडता प्रकार..
जि.प.शाळा.चव्हाणवस्ती शाळेत झाडांची रेलचेल
असल्याने बाहेर क्रिडांगणावरच मुलांना बस्कर टाकून
योगासने घ्यायचे ठरवले..
साधी सोपी आसने मुले चांगली करतातच,पण
धनुरासनासारखी योगासने सुद्धा मुलांनी अतिशय
चांगल्या प्रकारे केली...

Wednesday, 24 August 2016

सकाळ पेपरने घेतली दखल

बैलगाडीतून काढलेली मुलांची मिरवणूक/स्वागत
सर्वांनाच आवडले.आमच्या सर्व शिक्षक मिञांनी
अभिनंदन केले.मा.गटशिक्षणाधिकारीश्री.देशमुख सोा नी
पाठ थोपटली,सकाळ वृत्तपेपरने शाळेची मागील २ वर्षा-
पूर्वीची परिस्थिती व आम्ही या शाळेत दि.२१/०८/१४ रोजी
आलो त्या
नंतर वाढलेला पट,लोकसहभाग इ.बाबी जाणून घेतल्या
व माझी गुणवत्तापूर्ण शाळा या सदरात आमच्या जि.प.शाळा
चव्हाणवस्ती(बागेचीवाडी)शाळेची बातमी दिली..यासाठी
सर फाउंडेशनचे मा.माशाळे सर तसेच मा.सुधीर नाचणे (कें.प्र)
साहेबांच चांगलं सहकार्य लाभलं

शै.वर्षाची वेगळी सुरूवात

आज शाळेचा पहिला दिवस..दि.१५/०६/२०१६
नविन शैक्षणिक वर्षाची सुरुवात.....
मा.नंदकुमार साहेबांनी सांगीतल होत की मुलांचे
स्वागत वेगळ्या पद्धतीने करा..डोक्यात विचार
चालू झाले,माझी शाळा लहान वस्तीची,सगळे
शेतकरी व शेतमजूर..मग म्हणले चला पारंपारीक
रितीने स्वागत करूया.शेतात कामे चालू होती तिथे गेलो
वाघमारे सर आले म्हणून काम थांबवून विचारले
सर,काय अडचण आलीय का?.
हसून सांगीतले की अडचण नाही पण तुमची बैलगाडी
हवीय मुलांच स्वागत व मिरवणूक काढायला..
जेवायची सुट्टी करून तिकडच येतो असं त्यांनी सांगीतलं
एक नाही,दोन नाही तर तब्बल तीन गाडया घेऊन शेतकरी
शाळेत हजर..मुलांनी गाडीला फूगे बांधले व पहिली ते चौथी
ची सगळी मुले ३ गाडयात जाऊन बसली..चौघांनी ढोल
घेतला व निघाली मिरवणूक वस्तीला वेढा घालतं.
सहज जमलेला व सुंदर असा प्रवेशोत्सव जि.प.शाळा.
चव्हाणवस्तीत साजरा झाला.....