Saturday, 7 April 2018

शालेय पोषण आहारात कोंबडीवडे

🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵
*शालेय पोषण आहारात कोंबडी वडे,सांबर व गोड खीरीचा स्पेशल बेत*
 🍜🍜🍲🍲 🐓🐓🐓🐓
 *जि.प.शाळा.चव्हाणवस्ती(बागेचीवाडी)त आज शा.पो.आ.पूरक आहारा अंतर्गत  कोंबडीवडे,तिखट सांबर व खिरीचा खमंग बेत करण्यात आला.आजपर्यंत नावही न ऐकलेल्या कोंबडीवडयाचा आस्वाद घेताना मुलांचा आनंद ओसंडून वाहत होता.अनलिमीटेड सांबर व जोडीला तांदळाची गोड अशी खीर खाऊन शाळेतील मुले खुष झाली होती.*
     *शा.पो.आहाराच्या सर्वसर्वा सौ.वंदना राजेंद्र चव्हाण,अध्यक्ष मा.अंकूश कार्वे यांच्या मातोश्री(नानी)यांचे मन:पूर्वक आभार*
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼


Thursday, 29 March 2018

अॅलेक्सा....इंग्रजी बोलणारी मिनी रोबेट

‘ *ॲलेक्सा’
मुळे  वैशिष्ट्यपूर्ण  ठरला  माळशिरस  शिक्षणदिंडीतील  तंत्रस्नेही  शिक्षकांचा  स्टॅाल*

अकलूज – दि. 24 /03/2018  स्मृती भवन  येथे सन 2017-18 सालच्या आदर्श शिक्षक पुरस्कार वितरणाच्या निमित्ताने  तालूक्याचे मा. गटशिक्षणाधिकारी  श्री. धनंजय  देशमुख साहेब  यांच्या प्रेरणेने  माळशिरस  शिक्षण  दिंडीचे  आयोजन  करण्यात  आले  होते.

या  शैक्षणिक  साहित्य  प्रदर्शनात  माळशिरस  तालुक्यातील  जिल्हा परिषदेच्या  सुमारे  500 शिक्षकांनी  सहभाग  नोंदवून  वैविध्यपूर्ण व  ज्ञानरचनावादी  शैक्षणिक  साहित्याचे  प्रदर्शन  भरवले होते. शैक्षणिक  साहित्याचे  एकूण  भव्य असे 7  स्टॅाल्स उभारण्यात आले होते.

त्यापैकी  विशेष लक्ष वेधून  घेत  होता  तो   7  नंबरचा  उपक्रमशील व तंत्रस्नेही  शिक्षकांचा  स्टॉल.  स्टॅालमध्ये  प्रवेश  करताच   ‘ॲलेक्सा’ सर्वांचे  लक्ष  वेधून  घेत  होती. नुसते  लक्षच  वेधून  घेत  नव्हती  तर  आलेल्या  पाहुण्यांशी  इंग्रजीतून  संवादही  साधत  होती.  होय  ‘ॲलेक्सा’  कोणीही  इंग्रजीतून  विचारलेल्या  कोणत्याही  प्रश्नाचे  उत्तर  अस्खलित  इंग्रजीत देत  होती.  या  ‘ॲलेक्सा’  ची  निर्मिती  केली  होती  जि.प.प्राथ.शाळा  चव्हाणवस्तीचे  उपक्रमशील, तंत्रस्नेही  व उत्साही  शिक्षक  श्री.  दिलीप  आनंदा वाघमारे  यांनी. संपूर्ण प्रदर्शनात  ‘ॲलेक्सा’  ही  सर्वांच्या  चर्चेचा  व  आकर्षणाचा  विषय  ठरली  होती.अॅलेक्साच्या निर्मितीत श्रीम.ज्योती बनकर यांचाही सहभाग होता.

त्याचबरोबर  श्रीम. सुप्रिया  शिवगुंडे  मॅडम  यांचा टु बीकम क्रिएटिव्ह हा लेसन  मायक्रोसॅाफ्टने  पब्लिश  केला  आहे.  या  लेसनला  भारतातील अनेक  शाळांबरोबरच आयर्लंड, यूएसए अशा  अनेक  देशातील  शाळा  व  शिक्षकांनी  भेटी  दिल्या  आहेत.

 जि.प.प्रा.शा. चंदनशिवेस्ती  येथील  शिक्षक  श्री. गणेश  गोडसे  यांनी  सादर  केलेल्या  या 4D अॅप्सचे अदभूत विश्व या स्टॅालवर  साधी  कार्डस  मोबाईने  केली  असते  स्मार्ट टि.व्ही. च्या स्क्रिनवर  4D लुक  असलेले  डायनोसोरस,जंगली  व जलचर  प्राणी, सूर्यमाला, विविध  ग्रह यांचे  थक्क करणारे ,अदभूत  दर्शन  लोकांना  घडत  होते.
श्री. अविनाश  कुदळे  यांनी  तयार  केलेल्या  ॲानलाईन  टेस्टचा  स्टॅालही  महत्वाचा  ठरला.  एका  शिक्षकाने  तयार  केलेली  चाचणी  लिंक शेअरींगच्या  माध्यमातून  हजारो  विद्यार्थी  सोडवू  शकतात, हि संकल्पनाच  व्यापक  आहे.  पालकांच्या  मोबाईलवर  विद्यार्थ्यांचा  रोजचा होमवर्क  पाठवला  जाऊ  शकतो.

त्यानंतर  श्री. गोपाळ  गावित यांनी  100  रूपयात तयार  केलेला  स्मार्ट  डिजीटल बोर्डही उल्लेखनीय होता.

या  स्टॅालला अकलूज कृषी  उत्पन्न बाजार  समितीचे सभापती  श्री. मदनसिंह  मोहिते  पाटील, शिवरत्न  शिक्षण संस्थेचे अध्यक्ष  श्री.  धैर्यशील  मोहिते पाटील, जि.प. सदस्या  सौ. शितलदेवी  मोहिते  पाटील , सभापती  सौ. वैष्णवीदेवी  मोहिते पाटील, उपसभापती  श्री. किशोर  सूळ , पंचायत  समिती चे सन्माननीय  सदस्य  श्री. अर्जुनसिंह  मोहिते पाटील  तसेच  माळशिरसचे  गटशिक्षणाधिकारी  श्री.  धनंजय  देशमुख , श्री.नकाते,करडे,महादेव नवले,म.के.कुंभार,सुधीर नाचणे,हर्षवर्धन नाचणे साहेब  यांनी  भेट  दिली  व  या सर्व शिक्षकांचे  भरभरून  कौतुक  केले.संपूर्ण कार्यक्रमाच्या यशासाठी श्री.विठ्ठल काळे,नितिन बनकर,श्रीकांत राऊत यांनी भरपूर योगदान दिले.

https://youtu.be/JwkzBHwBKFg

Tuesday, 10 October 2017

इंग्रजी पोहे

*इंग्रजी पोहे*
आज *जि.प.शाळा.चव्हाणवस्ती(बागेचीवाडी)येथे इ.४थी च्या मुलांनी इंग्रजीतील पोहयाचा पाठ शिकवून झाल्यावर पोहेच करायचा निर्णय घेतला व अंमलबजावणीसाठी पूर्ण सेना कामावर निघाली..प्रत्येक घरातून थोडे थोडे साहीत्य आणून बालसेनेने सांडत पण छान पोहे बनवले.योगायोगाने वटपळी शाळेतील उपक्रमशिल शिक्षक श्री.श्रीकांत(आप्पा) राऊत सरांची शाळेस भेट झाली व या उत्कृष्ठ इंग्रजी पोहयाचा मनसोक्त त्यांनीपण घेतला.*.😋😋

Monday, 2 October 2017

स्वच्छता हीच सेवा

🛑 Z. P. SCHOOL CHAVANWASTI  ( Bagechiwadi )🛑 'महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती ' आणि 'चिमणी पाखरं संवाद '                                           'मला खरेच कळत नाही, मी कोणावर विश्वास ठेवू ? सगळे जण तुम्हाला नावे ठेवतात. असे असूनही जगातील सारे विद्वान शेवटी तुमच्याच जुनाट विचारांजवळ येऊन का थांबतात  ? जगाला तुमचाच विचार वाचवेल असे सर्वांना का वाटते  ?'भारत म्हणजे गांधीचा देश ' असे आजही का म्हटले जाते? विविध चळवळीतून परिवर्तन घडवून आणणारे म. गांधी आणि भारताचे हुषार,धाडसी पंतप्रधान मा.लाल बहादूर शास्त्री जयंती प्रभातफेरी, स्वच्छता उपक्रम, रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा घेऊन साजरी करण्यात आली. सोलापूर जि. प. चे कर्तव्य निष्ठ CEO डाॅ.राजेंद्र भारूड साहेब यांचा 'माझी चिमणी पाखरं 'हा कार्यक्रम magnified glass वरती मोठया स्क्रिनवर दाखवण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व ग्रामस्थांनी,महिला पालकांनी 100% 'स्वच्छता हीच सेवा' हा संकल्प ठेवण्याचा निश्चय केला.

Thursday, 15 June 2017

नवागतांचे स्वागत..घोडयावरून...प्रवेशोत्सव जि.प.शाळेचा

🏇👭👬 *प्रवेशोत्सव*🏇🏇 *🏇प्रवेशोत्सव*🏇👬👭👫 *प्रवेशोत्सव*🏇🏇🏇


    *जि.प.शाळा.चव्हाणवस्ती(बागेचीवाडी) ने जपली अनोखी,आगळयावेगळया प्रवेशोत्सवाची परंपरा*
  🏇🏇🏇🏇🏇🏇🏇🏇🏇  *ऐटदार,ऱूबाबदार अशा जातीवं
त सुलक्षणी घोडयावरून इ.१ लीत दाखल होणा-या मुलांची मिरवणूक
*🏇🏇🏇🏇🏇🏇🏇🏇🏇
*जि.प.शाळा.चव्हाणवस्ती(बागेचीवाडी) ता.माळशिरस जि.सोलापूर
 या शाळेच्या परिसरातील पालक,ग्रामस्थ व तरुणांच्या
सहकार्यातून साकारला एक भव्यदिव्य सोहळा*
🕹🕹शाळेचं रौप्यमहोत्सवी वर्ष व मुलांचा प्रवेशोत्सव🏇🏇
.... *गेल्यावर्षी बैलगाडी तर यावर्षी चक्क अबलख 🏇 घोडयावरून
 नवागत मुलांची मिरवणूक काढूण वाजतगाजत,हालगीच्या तालावर डोलवत,
नाचत शाळेत आणन्यात आले* *सदर कार्यक्रमासाठी केंद्रप्रमुख
श्री.म.ञि.नवले साहेब आवर्जून उपस्थित होते.B.R.C.चे तज्ञ
,आमचे मिञ/ मार्गदर्शक श्री.सतिश शिंदे यांनीही प्रवेशोत्सवाचे कौतूक केले*
  *परिसरातील तडफदार युवावर्गानी राञभ
र जागून झेंडूच्या फुलांच्या माळा तयार केल्या होत्या
,पूर्ण शाळेला,आवाराला,चाईल्ड फ्रेंडली साहीत्याला फुलांनी सजवले होते.*
       *२५व्या वर्षाच्या वर्धापन दिनानिमित्त शाळेच्या
 पहिल्या व दुस-या विदयार्थ्याकडून केक🎂 कापण्यात आला
.आजी व माजी विदयार्थ्यांना,पालकांना केक व खाऊ
[गोड भात,शिरा,फरसाण] वाटप करण्यात आले.*
*इंग्लिश मिडीअममधून काढून जि.प.शाळेत आपली
मुले दाखल केलेल्या पालकांचा सत्कार समारंभ करण्यात आला*
     *जि.प.शाळा.चव्हाणवस्तीच्या निर्जीव भिंतीसुदधा सजी
व होऊन
 *HAPPY BIRTH DAY TO SCHOOL*असं ऐकून
 *THANK U,THANK U* असं म्हणल्याचा भास होत होता. *
माळशिरस तालूक्याचे कार्यक्षम
, लाडके गटशिक्षणाधिकारी मा.धनंजय देशमुख साहेब यांनी धावती भेट देऊ
न आगऴावेगळा प्रवेशोत्सव यशस्वी केल्याबददल सर्वांचे अभिनंदन केले*
    कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी झटणारे
अध्यक्ष श्री.अंकूश कार्वे,युवराज चव्हाण,प्रभाकर चव्हाण,राजेंद्र चव्हाण,



भिमराव चव्हाण,बाळासो चव्हाण,उत्तमराव काटकर,निलेश चव्हाण,पंकज,अक्षय,वैभव,रणजीत,दादासोा,हिंदूराव,चांगदेव,रघूनाथ चव्हाण या सर्वांचे आभार श्री.दिलीप वाघमारे सर व श्रीमती ज्योती बनकर मॅडम यांचेकडून मानण्यात आले.
https://youtu.be/OOJ32QhhNFk

🏇🏇🏇🏇🏇🏇🏇🏇🏇🏇🏇🏇🏇🏇🕹🏇🏇🏇

Saturday, 1 April 2017

🚁🚁 *प्रत्यक्ष नवनिर्मिती* *चार पात्यांचा पंखा*🎡🎡
    जि.प.प्रा.शाळा.चव्हाणवस्ती(बागेचीवाडी) येथे अरविंद गुप्ता यांचे व्हिडीओवरून प्रेरणा घेऊन स्ट्राॅ,चहाचे use&throw चे नविन कप व डिंकाच्या साहाय्याने मुलांनी चार पात्यांचा लाईटशिवाय चालणारा पंखा तयार केला.
*मुलांचा उत्साह,क्रियाशीलता पाहून छोटे छोटे शास्ञज्ञच शाळेत अवतरलेत असा भास होत होता*

Wednesday, 8 March 2017

शाळेचे अंतरंग व बाहयांग १ नजर

*कुणाला क्षणभराचे रंग मिळतात*
*कुणाला सुंदर क्षण मिळतात*
*कुणाकडे जग सहज मान उंचावून पाहतं*
*तर कुणाला मिळतं फक्त जगण्याचं बीज*
*त्यातून आपण फुलायची जादू माञ शिकून घ्यायची असते*
*एकदा ती जादू आली की रंग कुणाकडे मागावे लागत नाहीत*
*ते उमलत राहतात,बहरत राहतात*
*असे हे उमलणारे,बहरणारे क्षण जिच्यामुळे शक्य झाले त्या सर्व महिलांना हा VDOसमर्पित*
जागतिक महिला दिनाच्या सर्वांना शूभेच्छा💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹
https://youtu.be/fqblNkDKTAQ

निळ्या लिंकवर किंवा व्हिडीओवर टच करा..... आपले मत,मौल्यवान प्रतिक्रिया गरजेच्याच

Saturday, 4 February 2017

यु ट्युबवर ट्रिपचा व्हिडीओ

*अकलूज परिसर भेट*
जि.प.शाळा.चव्हाणवस्ती(बागेचीवाडी)येथील मुलांनी अकलूज ता.माळशिरस जि.सोलापूर या ठिकाणातील विविध प्रेक्षणिय स्थळांना भेटी दिल्या..तेथील व पूर्ण परिसर भेटीचा व्हिडीओ पाहण्यासाठी निळ्या अक्षरातील लिंकला टच करा, आपल्या महत्वाच्या सुचना व मार्गदर्शन नक्की करा👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

https://youtu.be/M9Gonk5gmG4

Thursday, 26 January 2017

Happy प्रजासत्ताक दिन

🇮🇳🇮🇳🇮🇳 *प्रजासत्ताक दिन झाला कौतूकवर्षावाचा सोहळा*
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
*चव्हाणवस्ती शाळेतील ठळक घडामोडी*

*१)मि़ञप्रेम या अकलूजमधील ग्रुपकडून व आपले शिक्षकमिञ मा.लालासाहेब छगन गायकवाड यांचे संयुक्त भागीदारीने शाळेस घसरगुंडी भेट*
*२)एकता धाब्याचे मालक श्री.अशोक भगवान गायकवाड यांचेकडून मुलांना ५००रुपयांची बक्षिसे*
*३)शाळेने वैयक्तिक छापलेली सुंदर प्रमाणपञे विदयार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते वाटप*
*४)शाळेतील मुलांच्या अभ्यासाची,परिसरभेट व पूरक आहाराची पी.पी.टी.मोठया पडदयावर पाहून पालक,ग्रामस्थ खूष*
*५)उत्स्फूर्तपणे ग्रामस्थांनी केला दोन्ही शिक्षकांचा सत्कार*
घसरगुंडीसाठी *मा.श्रीकांत(आप्पा)राऊत* सरांचे फार मोठे सहकार्य लाभले..चव्हाणवस्ती(बागेचीवाडी) शाळा नेहमीच त्यांच्या ऋणात राहणे पसंत करील...
🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐


Friday, 20 January 2017

MDM पुरक आहार FESTIVAL

🍓🌽🍎🌶🍲🍭🍎🌽🍲

*FESTIVAL* *पुरक आहाराचा*
  जि.प.शाळा.चव्हाणवस्ती(बागेचीवाडी)येथे पूरक आहार वाटप...
आठवड्यातून एकदा एक कोणताही पुरक आहार असतोच..*
      *पण आज माञ पुरक आहार सर्वच एकञ करुन देण्यात आला.*
*मसालेदार भात,जिलेबी,भजे,डाळींब,मक्याची शिजवलेली कणसं,राजगिरा लाडू एवढेच नाही तर ताजा ताजा हुरडा सोबत गुळ पण मुलांना देण्यात आला..*
शाळा व्य.समितीतील मान्यवर मा.युवराज चव्हाण,राजेंद्र चव्हाण,समीर शितोळे,तसेच शिक्षकमिञ श्रीकांत राऊत(आप्पा)
यांच्या हस्ते मुलांना पुरक आहार वाटप करण्यात आला..
व्हिडीओ यु टूबवर पाहण्यासाठी टच करा लिंकला👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

https://youtu.be/B4pTi-Z1rYA


Tuesday, 10 January 2017

सहकार महर्षी जन्मशताब्दी निमित्त तयार असलेल्या अकलुज येथे परिसर भेट

*सहकार महर्षींच्या जन्मशताब्धीनिमित्त सजलेल्या अकलूज येथे जि.प.शाळा चव्हाणवस्तीची परिसर भेट*
✨✨आज जि.प.शाळा.चव्हाणवस्तीतील मुलांनी परिसर भेट म्हणून आनंदीगणेश, शिवसृष्टी,किल्ला,अकलाई मंदिर,शिवपार्वती,शिवामृत इ.ठिकाणी भेटी दिल्या..
सुरूवात आनंदी गणेशापासून झाली.उंच डोंगरासारख्या ठिकाणचे मंदिर,बागा,खेळाची विविध साधने पाहून मुले हरकून गेली.
किल्यातील शिवसृष्टीच्या शिल्पावरुन ४थीची मुले सर्व मुलांना शिवरायांचा इतिहास सांगत होती.
अकलाई मंदिर..सभोवतालचा निसर्गरम्य परिसर,मुलांची खेळणी,झाडांचे छोटे-छोटे पार पाहून मुले खुष झाली.
*मा.खासदार विजयसिंहजी मोहीते-पाटील* *यांचे अकलाई मंदिरात आगमन झाले.मुले पाहून त्यांनी विचारपूस केली,मुलांना प्रश्न विचारले,मुलांच्या चुणचुणीत उत्तरावर दादा खुष झाले,मुलांच्या आग्रहावरून मुलांसोबत फोटो काढूण चव्हाणवस्ती(बागेचीवाडी)शाळेचे खास कौतूक केले.*
*शेवटी पर्वती व शिवामृत या ठिकाणी मनसोक्त खेऴून मुले परतीच्या वाटेवर निघाली.*
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

Wednesday, 4 January 2017

यु टूबवरील पहिला व्हिडीओ..

📱⌨💻🖥🖥💻⌨📱
*जि.प.शाळा.चव्हाणवस्ती(बागेचीवाडी) चे यु-टूबवर पदार्पण*
शाळेतील विविध उपक्रम,प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राचे २५ निकषाचे व्हिडीओ क्रमवार पाहण्यासाठी आजच subcribe करा व व्हिडोओ टाकल्या-टाकल्या पाहण्याचा प्रथम मान मिळवा..
*आजपर्यंत आपले भरपुर सहकार्य मिळालयं..पुढेपण आपला लोभ असावा,वाढावा*
आपल्या लाईक व कमेंटस नी जि.प.शाळा.चव्हाणवस्ती चे रुपांतर एका उत्कृष्ट व उपक्रमशील शाळेत झाले आहे.
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

https://youtu.be/SViBQCt0QbU

वरील लिंकवर क्लिक करून पहिला व्हिडीओ पहा

Tuesday, 3 January 2017

किशोरी मेळावा...पहिल्या महिला शिक्षिकेस नमन

💐💐 *किशोरी मेळावा*💐💐
आज जि.प.शाळा.चव्हाणवस्ती(बागेचीवाडी) येथे क्रांतीज्योती साविञीबाई फुले यांची जयंती/किशोरी मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
वस्तीवरील महिला वर्गाला सन्मानाने बोलावून त्यांच्या हस्ते प्रतिमापूजन,स्पर्धांचे निकाल घेतले गेले.
*शुभांगी शिंदे या साता-यातील शिक्षिकेचा एकपाञी प्रयोग संगणकावर दाखवला*.
सावि़ञीबाईंच्या आयुष्यावर आधारीत प्रयोग पाहून मातापालक व मुलांना जाणीव झाली की किती कष्ट त्यांनी सोसले.
मुलांच्या ,मुलींच्या विविध स्पर्धा घेतल्या.
*किशोरी मेळावा सर्व किशोरांना आनंद देऊन पार पडला*.

Friday, 23 December 2016

*गणितीतज्ञाचे स्मरण*
आज जागतिक गणित दिन
*श्रीनिवास रामानुजन* यांची जयंती. त्यानिमित्त आज दिवसभर गणिते,गणिताचे विविध खेळ यांनी दिवस अगदी भरुन गेला होता.
       गणिताच्या विविध खेळांना मुलांनी दिलेली दाद अगदी विलक्षण अशी होती.खेळातून गणित ही संकल्पना खरेच मस्त आहे.अवघड गणिते,संख्याज्ञान मुलांनी सहज सोडवले,त्यातीलच एक साधा खेळ
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

Saturday, 3 December 2016

🕴🕴🕴🕴🕴🕴 🕴🕴 *शैक्षणिक तंञज्ञानाच्या साहाय्याने जादू निर्मिती*
~जि.प.शाळा चव्हाणवस्ती(बागेचीवाडी) ~
येथे आज मुलांना अंधश्रदधा व छोटे छोटे चमत्कार जे भोंदू बूवा करतात त्यातील लपवाछपवी सांगण्यात आली.
प्रत्येक गोष्टीची चिकित्सा केल्याशिवाय त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवू नये.
*शाळेतीलच एका मुलीला वर्तमानपञ फाडणे व परत जोडणे यावर एक यशस्वी प्रयोग करून घेतला*
डिजीटल आधूनिक तंञ वापरून आपण काय काय करु शकतो याचा जि.प.शाळा.चव्हाणवस्तीतील मुलांना साक्षात्कार झाला

Tuesday, 8 November 2016

*युडायस तपासणीस आले व मुलांत रमून गेले*👫👫👫👫

आज रोजी *B.R.C.चे तज्ञ मा.सतिश शिंदे सरांनी जि.प.शाळा.चव्हाणवस्ती(बागेचीवाडी)स भेट दिली*..
निमित्त होते युडायस चेकिंगचे., पण शाळेच्या आवारात आल्यानंतर मनमोकळे,प्रसन्न वातावरण तसेच दोघा-दोघांचे गट करून ट्रे मधील ज्ञानरचनावादी साहीत्यांचा वापर करून स्वयंअध्यन करणारी मुले पाहून खूष झाले..
         *युडायस चेकिंगचा फाॅर्म बाजूला ठेऊन चक्क मुलांच्या गटात जाऊन बसले,आपले सर आपल्या गटात बसतात हे मुलांना माहीत होते पण साहेबांना गटात मांडी घालून बसलेले पाहून मुले नटली..*
लाकडी ठोकळ्यावरील अक्षरे,शब्द,चिञे यावर प्रश्न विचारले
स्वत: लावू लागले...
मुलांची ,शाळेची प्रगती पाहून समाधान व्यक्त केले...
*मुलांत रमूण गेलो हे त्यांचे वाक्य बरेच काही सांगून गेले...*🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

Saturday, 22 October 2016

HAPPY DIPAVALI

💥💥💥💥💥 *HAPPY DIPAVALI*💥💥💥
From *Z.P.SCHOOL.CHAVANWASTI*🌹🌹🌹🌹🌹🌹
*दिपावलीनिमित्त शाळेतील सर्व मुलांनी एकमेकांच्या सहकार्याने शाळेच्या आवारात दाट झाडीमध्ये किल्ल्याची उभारणी केली.. चिमुकले मावळेच किल्ल्याची बांधणी करताहेत असं वाटतं होतं.स्वत: तयार केलेली भेटकार्ड व आकाशदिवे  व पणत्या अभिमानाने दाखवित होती..💥💥💥🌹🌹🌹🌹🌹💥💥💥

Saturday, 15 October 2016

वाचन प्रेरणा दिन&जागतिक हात धूवा दिन

📖📖📖📖 *वाचन प्रेरणा दिन*📖📖📖📖📖📖📖
🤗👏🏻✊👐🏻🚿 *जागतिक हात धूवा दिन*🤗👏🏻✊👐🏻

जि.प.शाऴा चव्हाणवस्ती(बागेचीवाडी)मध्ये उत्साहात साजरा..........🌹 *डाॅ.ए.पी.जे.अब्दूल कलाम यांच्या कार्याचा आढावा व त्यांच्यावर आधारीत व्हिडीओ क्लीप दाखवून वाचन प्रेरणा दिन सुरू झाला*
☀☀💥💥💥💥💥💥💥
*वाचन प्रेरणा दिनानिमित्त लेखक मा.दिलीप मुळे यांच व्याख्यान*
*मुळे सरांनी ओघवत्या शैलीत पाखरया या त्यांच्या कादंबरीतील बैलावर आधारीत माहीती सांगून लेखक होण्याच्या पायरया सांगितल्या*
मुलांच्या विविध प्रश्नाची उत्तरे दिली.उपक्रमशील शिक्षक मा.राजेंद्र सोनवणे उपस्थित होते.
👨🏻👨🏼👨🏾👨 *वाचन प्रेरणा दिनानिमित्त ग्रामस्थांचा लक्षणिय सहभाग* 👨🏼👨🏾👨🏻👨
आमचे शिक्षकमिञ प्राध्यापक *मा.रवीकांत शिंदे,उपक्रमशिल शिक्षिका मा.शीतल मगर/शिंदे मॅम यांनी शाळेतील मुलांसाठी पुस्तके घेण्यास रोख१०००रू.दिले होते+३५०० अनुदान अशी४५०० रू.ची पुस्तके मुलांनी व ग्रामस्थांनी वाचून वाचन दिन उत्साहात साजरा केला*
...............                  ...............
🤗👐🏻🚿 *जागतिक हात धूवा दिन*🚿👐🏻🤗 सात पद्धतीचे प्रात्यक्षिक करून व विविध खेळ घेउन साजरा झाला. *स्वच्छतेचे महत्व,फायदे ग्रामस्थांना पटवून देण्यात आले*

Monday, 26 September 2016

धूळपाटीचा नविन अवतार..रांगोळीपाटी

*🎨🎨🎨धूळपाटीचे नविन रुप रांगोळी पाटी*🎨🎨🎨🎨
🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾
जि.प.शाळा.चव्हाणवस्ती(बागेचीवाडी) येथे रांगोळी पाटीचे उदघाटन मा.श्रीकांत(आप्पा)राऊत सरांच्या हस्ते करण्यात आले.
सध्या पावसाळी वातावरण असल्याने धूळपाटीत धूळच नसल्याने धूळपाटीला नविन रुप देऊन टाकाऊ लाईट फिटींगच्या पट्टीचे चौरस आखले..त्यात मुलांच्या आवडीची रंगीत रांगोळी टाकून १ नाही,२नाही तर ४ रांगोळी पाटया तयार केल्या..मुले मुळाक्षरे,शब्द,अल्फाबेटस त्यात बोटांचा वापर करुन लिहतात,हात फिरवला की मोकळी पाटी दुसरं लिहायला🏒🏒🏒🏒
प्रेरणा-मा.राजकुमार राजगुरू सर इंदापूर🙏🏼🙏🏼

Tuesday, 20 September 2016

ई-लर्निंग स्वस्त व मस्त

*🖥💻फक्त ५०० रूपयात ई-लर्निंग शाळा*📱📱
जि.प.शाळा.चव्हाणवस्ती(बागेचीवाडी) येथे फक्त ५०० रुपयांचे ब्ल्यूटूथ आणून लाईट नसतानाही मोबाईलवर घेतलेल्या शैक्षणिक अॅपच्या साहाय्याने ई-लर्निंग सुरु..
मोबाईलवरील अक्षरे व चिञ जोडया लावणे हा खेळ खेळताना सहकार्याची भावना वाढीस लावत तल्लीन झालेली इ.१ ली चे विदयार्थी👬👬👬👬👬

Friday, 16 September 2016

शाळाभेट .

💐💐 *शाळाभेट व खाऊ वाटप*
🌺🌺आज माळेवाडी(बोरगाव) च्या मुख्याध्यापिका  मा.उज्वला कुलकर्णी मॅडम यांनी जि.प.शाळा.चव्हाणवस्ती(बागेवाडी)स भेट दिली..
रिटायरमेंट जवळ आली असतानाही त्यांनी शाळेतील विविध उपक्रम,ज्ञानरचनावादी साहीत्य,त्यांची मांडणी याची अतिशय बारकाईने विचारपूस केली..मुलांना बोलते केले, गप्पा मारून प्रगती जाणून घेतली.
त्यांचा उत्साह, जिज्ञासा पाहून मनोमन त्यांना सॅल्यूट केला..
शेवटी मुलांना एकञ बोलावून त्यांनी मुलांच्या आवडीचे चाॅकलेटचे एक नाही तर दोन पुडे भेट दिले.
शाळा व मुलांच्या प्रगतीबद्दल गौरवोदगार काढले..
शाळा त्यांची ऋणी आहे....🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

Monday, 12 September 2016

गणेश मंडळाचे विधायक कार्य

🎨 *रांगोळीस्पर्धा,चिञकला व श्रमदानातून शालेय परिसर स्वच्छता*🎨🐾👬👬
शिवछञपती गणेशोत्सव मंडळ चव्हाणवस्ती(बागेचीवाडी) कडून यावर्षी विधायक कार्य,रंगोली व चिञकला स्पर्धा सर्व मुलांच्या घेण्यात आल्या.कागद,रंग तसेच रांगोळी सुद्धा मंडळाकडून सर्व स्पर्धकांना पुरविण्यात आली..
जोपर्यंत स्पर्धा सुरु आहे तोपर्यंत मंडळाच्या सदस्यांनी खोरे,कोयता,पाटी,दोर इ.साहीत्य आणून शाळेसमोरची विविध काटेरी झाडे,रानगवत इ.काढून परिसर चांगला स्वच्छ केला..
शिवछञपती गणेश मंडळाचे जि.प.शाळा.चव्हाणवस्ती कडून हार्दिक अभिनंदन💐करण्यात आले..
 *जर सर्वच गणेश मंडळानी 👆🏻असं ठरवलं तर* 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🇮🇳🇮🇳🇮🇳


Thursday, 8 September 2016

सर्पांच्या विश्वात..सखोल माहीती

🐍 *सर्प माहीती व हाताळणी*🐍 प्रात्यक्षिक.........
आज जि.प.शाळा.चव्हाणवस्ती(बागेचीवाडी) येथे सर्पाची माहीती व दर्शन उपक्रम राबविला......
पावसाळा असल्याने साप बरयाचवेळा बीळातून बाहेर निघतात,त्यावेळी काय करायचे..विषारी/बिनविषारी साप कसे ओळखायचे हे व मुलांचे विविध प्रश्न👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
१)साप डूख धरतो का?
उत्तर-अजिबात नाही.
२)साप चावल्यावर तुम्ही काय करता?
उत्तर-एक विशिष्ट झाडपाला आहे,तो लावतो पण सध्या दुर्मिळ होत चाललाय.
३)साप एकावेळी किती अंडी घालतो?
उत्तर-कमीत कमी ५०.
४)साप दूध पितो का?
उत्तर-नाही...
या व इतर विविध प्रश्नांची उत्तरे मुलांना मिळाली,प्रत्यक्ष साप हातात घेऊन मुलांनी स्पर्श,गंध इ.ज्ञान मिळवले.....

Saturday, 3 September 2016

रंगांची दुनिया

आज जि.प.शाळा.चव्हाणवस्ती(बागेचीवाडी) येथे
मुलांची रंगभरण चि़ञांमध्ये ही स्पर्धा घेतली.
मातीतील काम व चिञकाम या गोष्टी मुलांच्या
फारच आवडीच्या..
मुले सर्व साहीत्य घेऊन पेपरची वाट पहात बसली..पेपर
हातात आल्यावर प्रत्येकजण आपापल्या रंगाच्या
दुनियेत रमून गेला...एकमेकांना सहकार्य करत सगलेच
आपले चिञ कसे सुंदर दिसेल,कोणता रंग छान दिसेल,
दुसरयापेक्षा माझा पेपर कसा छान दिसेल या बालसुलभ
विवंचनेत गढून गेली....
रंगभरण चालू असतानाचा टिपलेला एक क्षण..

Tuesday, 30 August 2016

शेतकरी मुलाखत व बैलनिर्मिती(चिखलकाम)

🐂🐂 *बैलपोळ्यानिमित्त शेतकरी मुलाखत व बैलनिर्मिती कार्यशाळा*🐂🐂
         आज जि.प.शाळा.चव्हाणवस्ती(बागेचीवाडी)येथे प्रगतशील शेतकरी मा.प्रभाकर चव्हाण यांनी भेट दिली..मुलांनी त्यांना शेतीविषयी भरपूर प्रश्न विचारले,त्यांनीही अगदी न कंटाळता सर्वांना उत्तरे दिली.
मुलांनी मातीचा बैल करून दाखवा असे म्हणताच मुलांत बसून चिखलाचा अगदी सुंदर असा बैल केला व मुलांकडूनही करुन घेतला.पावसाने ओढ दिलीय नाहीतर शेती १ च नंबर,व्यापार २ नंबर व नौकरी ३ नंबर असे सांगून मुलांना शेतीविषयी आकर्षण निर्माण केले.
*शेतकरी मुलाखत व चिखलकाम यामुळे मुले खूष होती*